Pune News : तिसऱ्या लाटेसाठी जम्बोचे पुन्हा स्ट्रक्‍चर ऑडिट

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे. अशातच कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे तिसरी लाट महिनाभरातच येण्याचा धोका आहे, तर जम्बोचे सध्याचे स्ट्रक्‍चर 15 जुलैपर्यंतच वापरणे शक्‍य आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन, या स्ट्रक्‍चरचे पुन्हा सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शिवाजीनगर येथे उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरचे स्ट्रक्चर 15 जुलैपर्यंत वापरण्यास सुरक्षित असल्याचे प्रमाणापत्र दिल्ली आयआयटीकडून देण्यात आले आहे. यापूर्वी केलेल्या ऑडिटमध्ये हे हॉस्पिटल 31 मेपर्यंतच वापरता येणार असल्याचा अहवाल होता.

शहरातील रुग्ण कमी झाल्याने 15 जानेवारी रोजी जम्बो बंद करण्यात आले होते. दिल्ली आयआयटीने सांगाड्याचे सुस्थितीविषयक प्रमाणपत्र दिल्यानंतर 22 मार्चपासून प्रत्यक्ष रुग्ण दाखल करून घेण्यास सुरुवात करण्यात आली.

शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेल्यानंतर जम्बोमुळे दिलासा मिळाला. रुग्णालयाची क्षमता 700 खाटांपर्यंत वाढविण्यात आली.

मात्र, कोरोना रुग्णसंख्या कमी आणि पॉझिटिव्हीटी रेट कमी झाल्याने जम्बोतील ऑक्सिजन बेड कमी केले आहेत. शिवाय मनुष्यबळ व आवश्यक सुविधांचे व्यवस्थापन करण्यासाठी जम्बो सेंटरमध्ये मागील मंगळवारपासून नवीन रुग्णांचे प्रवेश बंद करण्यात आले आहेत. शहरातील रुग्णसंख्या कमी असल्याने जम्बोमध्ये दाखल असलेल्या 25 रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर जम्बो बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असले तरी संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याच्या दृष्टीने जम्बोचे स्ट्रक्‍चर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.