Pune News : अन्यायकारक इंधन दरवाढ कमी करा – समाजवादी पक्षाची मागणी

एमपीसीन्यूज : सध्या कोरोनाचे संकट कायम आहे. त्यात लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. छोटे मोठे उद्योग बंद पडले आहेत. असे असताना केंद्र सरकारने इंधन दरवाढ करुन सर्वसामान्य नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. ही अन्याकारक इंधनदरवाढ कमी करावी, अशी  मागणी समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष रफिक कुरेशी यांनी केली आहे.

याबाबत समाजवादी पार्टीच्या शिष्टमंडळाने शहराध्यक्ष रफिक कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

यावेळी पक्षाचे पदाधिकारी बी. डी. यादव, रवी यादव, ब्रिजेश यादव, राजकुमार यादव, नरेंद्र पवार, साजिद शेख, राहुल जाधव आदी उपस्थित होते.

सध्या देशातील जनता कोरोना महामारीमुळे महागाईचे चटके सोसत आहे. असे असताना केंद्र सरकरने गॅस, पेट्रोल आणि डिझेल दरवाढ करून सर्वसामान्यांना जोरदार धक्का दिला आहे.

ही अन्याकारक गॅस, पेट्रोल व डिझेल दरवाढ कमी करावी; अन्यथा केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रफिक कुरेशी यांनी निवेदनात दिला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.