Pune News: ‘आम्ही तुमचे बाप आहोत, हे लक्षात ठेवा’; चंद्रकांत पाटील यांचा अजित पवार यांना टोला

एमपीसी न्यूज – अजित पवार यांना पुणे महानगरपालिकेत परत सत्ता येईल, अशी स्वप्नं पडत असतील तर त्यांनी स्वप्न पाहण्यात ऊर्जा वाया घालवू नये. आम्ही पण त्यांचे बाप आहोत, ही गोष्ट त्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला.

पुण्यात भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपने पुणे महापालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत पंधरापैकी अकरा जागांवर विजय मिळवला आहे. एक जागा काँग्रेसने आणि तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत. पण असे असतानाही पुणे महानगरपालिकेत आपली सत्ता येईल, असं स्वप्न अजित पवार पाहत असतील तर त्यांनी ही स्वप्न पाहण्यात ऊर्जा वाया घालू नये, कारण आम्ही देखील तुमचे बाप आहोत.

या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भाषण केले. ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या निवडणुकीत 282 तर 2019 च्या निवडणुकीत 305 खासदार निवडून आणले. याशिवाय भाजपला मदत करणाऱ्या खासदारांची संख्या 103 वरून 153 वर गेली आहे. इतके मोठे संख्याबळ असलेल्या पक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत त्यामुळे सर्वांनी त्याचा अभिमान बाळगायला हवा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.