Pune News : पुणे मेट्रोच्या स्थानकांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह इतर महापुरुषांची नावे द्या – संभाजी ब्रिगेड

एमपीसी न्यूज – पुण्यातील सर्व मेट्रो स्थानकांना (स्टेशन) महापुरुषांची नावे द्या अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे करण्यात आहे आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी दिली.

यावेळी संभाजी ब्रिगेड’चे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते, अॕड. विकास शिंदे, उपाध्यक्ष महादेव मातेरे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत धुमाळ, सुभाष जाधव, सुनिल जगताप आदी उपस्थित होते.

मेट्रो प्रशासनाला दिलेल्या पत्रात संभाजी ब्रिगेडणे म्हटले आहे की, पुणे हे विद्येचे माहेरघर असून सांस्कृतिक, परिवर्तनवादी आणि पुरोगामी चळवळीचा वसा आणि वारसा जपणारे शहर आहे. राष्ट्रमाता जिजाऊ मँसाहेब यांनी वसवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ याच पुण्यातून रोवली. पुणे जिल्ह्याने दोन छत्रपती दिले. मल्हारराव होळकर, राजमाता अहिल्याराणी होळकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, डाॕ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, लहुजी वस्ताद साळवे, दिनकरराव जवळकर, केशवराव जेधे, सरसेनापती वीर बाजी पासलकर आदी समाजसुधारकांच्या व महापुरुषांच्या विचारधारेतून हे पुणे नटलेले आहे. या महापुरुषांचा वैचारिक व वारसा आपण जपलं पाहिजे म्हणून त्यांच्या विचारांतून प्रेरणा मिळावी म्हणून वैचारिक ठेवा जपान करण्याचं काम आपण केले पाहिजे.

पुण्याची ओळख जगभर पोहोचली. इथली कर्तुत्वान माती आणि सांस्कृतिक चळवळ समाजासह जगायला अभिप्रेत आहे. त्यामध्ये महामेट्रोची भर पडली आहे. पुण्यात होणाऱ्या महा मेट्रो स्टेशनला महापुरुषांची नावे देऊन त्यांचा सन्मान करावा अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.

मेट्रो स्टेशनला देण्यात येणाऱ्या महापुरुषांची नावे खालील प्रमाणे
१) छत्रपती शिवाजी महाराज.
२) छत्रपती संभाजी महाराज.
३) मल्हाराव होळकर.
४) राजमाता अहिल्या राणी होळकर.
५) क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले.
६) राजर्षी छत्रपती शाहू महाराज
७) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले.
८) लहुजी वस्ताद साळवे.
९) दिनकरराव जवळकर.
१०) केशवराव जेधे.
११) सरसेनापती वीर बाजी पासलकर.
१२) महादजी शिंदे.
१३) शिवशाहीर अण्णाभाऊ साठे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.