Pune News : औरंगाबाद ऐवजी पुण्याचं नामकरण संभाजीनगर करा – प्रकाश आंबेडकर

एमपीसी न्यूज – औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करा, ही राजकीय मागणी आहे. तसा औरंगाबाद आणि संभाजी महाराज यांचा फार संदर्भ सापडत नाही. संभाजी महाराज यांची समाधी पुणे जिल्ह्यात आहे. त्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्याचं नाव बदलून संभाजी नगर करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ‘एबीपी माझा’ या वृत्तलावाहीनीशी बोलताना त्यांनी ही मागणी केली.

औरंगाबाद शहराच्या नामांतराची चर्चा सध्या राज्यात सुरू आहे. त्यावरुन राजकारण देखील होत आहे. यातच आता प्रकाश आंबेडकर यांनी हि मागणी केली आहे. आंबेडकर म्हणाले, औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करा ही राजकीय मागणी आहे. तसा औरंगाबाद आणि संभाजी महाराज यांचा फार संदर्भ सापडत नाही. संभाजी महाराज यांची समाधी पुणे जिल्ह्यात आहे. त्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्याचं नाव बदलून संभाजी नगर करा अशी आमची मागणी आहे. संभाजी महाराज यांचा अंत्यविधी आणि दफन पुण्यात झालं मग पुण्याला त्यांचं नाव दिलं पाहिजे, असं ते म्हणाले.

दरम्यान, संभाजी ब्रिगेडने देखील पुण्याचं नामकरण ‘जिजापूर’ करावे अशी मागणी केली आहे. बेचिराक झालेल्या पुण्याला राष्ट्रमाता जिजाऊ यांनी वसवलं, पुण्याला जिजाऊंचा इतिहास आहे. त्यामुळे पुण्याला जिजाऊंचे नाव देऊन त्याचे ‘जिजापूर’ असे नामांतरण करावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.