Pune News: आरोग्यप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांची बदली; आता डॉ. आशिष भारती वैद्यकीय अधिकारी

एमपीसी न्यूज – पुणे शहरात मागील 6 ते 7 महिन्यांपासून कोरोनाचे संकट निर्माण झाले आहे. या काळात झोकून देऊन काम करणाऱ्या महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांची राज्य शासनातर्फे बदली करण्यात आली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदावर डॉ. आशिष हिरालाल भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तशा प्रकारचे आदेश आज देण्यात आले आहे.

डॉ. हंकारे यांच्या विनंतीनुसार  सहाय्यक आरोग्य सेवा पुणे येथे त्यांची बदली करण्यात आली आहे. पुणे महापालिकेत डॉ. हंकारे यांची दिनांक 25 सप्टेंबर 2018 मध्ये प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली. ती 2 वर्षांसाठी असल्याचे राज्य शासनाने आदेशात म्हटले होते. दुसरे आरोग्य प्रमुख डॉ. नितीन बिलोलीकर यांना 15 दिवसातच कोरोनाची लागण झाली. तेव्हापासून ते वैद्यकीय रजेवर आहेत. तर, पुणे शहरात सध्या कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत आहे.

मोठ्या प्रमाणात टेस्ट वाढल्याने रुग्ण समोर येत आहेत. शिवाय मृत्यूचे प्रमाणही कमी होत आहे. मला या काळात सर्वांनीच सहकार्य केले, त्याबद्दल सर्वांचे आभार मानत असल्याचे डॉ. रामचंद्र हंकारे यांनी सांगितले. दरम्यान, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. हंकारे यांनी खाजगी हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात संवाद वाढविला होता. रुगांना बेडस मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.