Pune News : विधवा महिलांच्या बांगड्या न फोडण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर; पुण्यातील या गावाचा स्तुत्य निर्णय

एमपीसी न्यूज- पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी या गावाने ग्रामसभेत मंजूर केलेल्या एका ठरावावरून या गावाचं कौतुक सुरू आहे. पतीच्या निधनानंतर विधवा महिलांच्या बांगड्या न फोडण्याचा ठरावच या गावातील ग्रामसभेत मंजूर करण्यात (Pune News) आला आहे.
इतकच नाही तर त्याला प्रोत्साहन देण्यासाठी 25 विधवा महिलांची खणा नारळाने ओटी भरून या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी ही केली आहे. आदर्श गाव असलेल्या गावडेवाडी गावाने घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. प्रजासत्ताक दिनी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात हा निर्णय जाहीर करण्यात आला.

प्रजासत्ताक दिनानिमित्त गावडेवाडी गावात सरपंच स्वरूपा गावडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे गावातील विधवा महिला भारत गेल्याच मात्र पुणे जिल्ह्यात या गावाचे कौतुक केले जात आहे. यावेळी काही विधवा महिलांची खणा नारळ आणि ओटी देखील भरण्यात आली.
अनेक वर्षानंतर कपाळावर कुंकू लागल्याने या विधवा महिला देखील भारावून गेल्या होत्या. गावातील काही महत्त्वाची कामे (Pune News) आणि शुभकार्य देखील याच महिलांच्या उपस्थितीत करण्याची देखील ग्रामसभेत ठरवण्यात आले आहे. गावडेवाडी गावाने घेतलेल्या या निर्णयामुळे समाजात सकारात्मकता येऊ लागते. जो निर्णय या गावाने घेतला असाच स्तुत्य निर्णय इतर गावांनीही घेणे गरजेचे आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.