Pune News: ग्रंथालये आणि अभ्यासिका सुरू करा; महापौरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

एमपीसी न्यूज – पुणे शहरात मद्यालये सुरू झाली, तरी अद्याप ग्रंथालये आणि अभ्यासिका सुरू झालेल्या नाहीत. ग्रंथालये आणि अभ्यासिका सुरू करण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली आहे. 

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्वत: ट्वीटर वरून याबाबत माहिती दिली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, ‘पुणे शहरात मद्यालये सुरू झाली, तरी अद्याप ग्रंथालये आणि अभ्यासिका सुरू झालेल्या नाहीत, याची कल्पना असून मी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना पत्र लिहून ग्रंथालये आणि अभ्यासिका सुरू करण्याची मागणी केली आहे. लवकरात लवकर या दोन्ही गोष्टी सुरू व्हाव्यात, यासाठी पाठपुरावा करत राहीन’

पुढं ते असं म्हणतात, ‘अनलॉकच्या प्रक्रियेत काय सुरू करावे आणि काय बंद असावे, याच्या सूचना महापालिकेला राज्य सरकार देते. त्यांनी अद्याप ग्रंथालये आणि अभ्यासिका सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. ती मिळावी, यासाठी मी वारंवार पत्रव्यवहार करीत आहे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.