Pune News : ‘बीएसएनएल’च्या निवृत्त कर्मचा-यांना महागाई भत्ता मिळावा

एमपीसी न्यूज – ‘बीएसएनएल’ मधील निवृत्त कर्मचारी शेवटच्या तिमाहीत जाहीर होणाऱ्या महागाई भत्त्याच्या प्रतिक्षेत होते. मात्र, केंद्र करकारने 19 नोव्हेंबरला काढलेल्या अध्यादेशानुसार ऑक्टोबर 2020 पासून कर्मचा-यांचा महागाई भत्ता गोठवला आहे. या आदेशामुळे लाखो कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे या कर्मचा-यांना त्वरीत महागाई भत्ता मिळावा, अशी मागणी भारतीय मजदूर संघाच्या वतीने केली आहे.

याबाबतचे निवेदन भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळाने पुणे दूरसंचार कार्यालयाचे प्रधान महाप्रबंधक संदीप सावरकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी गाडेकर, किरण राजहंस, जयवंत पुरंदरे, शोभा हर्डीकर, वंदना कामठे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास ‘बीएसएनएल’ मधील निवृत्त कर्मचारी रस्त्यावर उतरेल, असा इशारा भारतीय मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी हरी सोवनी यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.