Pune News : निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू

एमपीसी न्यूज – काही दिवसांपूर्वी पुणे पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बाजीराव मोहिते (वय 61) असे या निवृत्त पोलिस अधिकार्‍याचे नाव आहे.

पुणे पोलीस दलात होते सहायक पोलिस आयुक्त म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाल्यानंतर मोहिते यांच्यावर जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरू असतानाच आज त्यांचा मृत्यू झालाय. दीड वर्षापूर्वी ते दलातून निवृत्त झाले होते.

मोहिते यांचा अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर पुणे पोलीस दलातून हळहळ व्यक्त केली जात आहे. बोलते यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.