Pune News : आता बेकायदेशीर आणि नोंद नसलेल्या मिळकतीच्या नोंदीतून महसूल !

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेच्या तिजोरीतील उत्पन्न वाढवण्यासाठी शहरातील बेकादेशीररित्या बांधलेल्या आणि नोंद नसलेल्या मिळकतींचा शोध घेत त्यांची मिळकतकर विभागाकडे नोंदणी करण्याकडे महापालिकेने मोर्चा वळवला आहे. त्यामाध्यमातून सुमारे दोन-सव्वादोन लाख मिळकतींची नोंद होऊन अंदाजे शंभर कोटींचा महसूल प्राप्त होण्याची अपेक्षा आहे.

शहर आणि उपनगरात बेकायदेशीरपणे बांधकामे बांधली गेली आहेत. मात्र, त्यांची महापालिकेच्या करआकारणी आणि करसंकलन विभागाकडे नोंद केलेली नाही. त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न बुडत आहे. त्यामुळे अशा बांधकामाचा शोध घेऊन करआकरणीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

आता कोरोना संकटामुळं महापालिकेच्या उत्पन्नात घट होऊन तिजोरीत 100 कोटी रुपये शिल्लक राहिले आहेत. त्याच अनुषंगाने उत्पन्न वाढीचे नवे स्रोत शोधून वर्षानुवर्षे कर भरत नसलेल्या मिळकतींची नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यानुसार ही विशेष मोहीम सुरु करण्यात आली आहे.

तत्पूर्वी, शहर आणि नवीन ११ गावांतील सुमारे १० लाख ६१ हजार निवासी, व्यावसायिक मिळकतींची नोंद महापालिकेकडे आहे. आता सुरु करण्यात येणाऱ्या मोहिमेतून अंदाजे चार लाख मिळकती आढळण्याची शक्यता आहे. परंतु, पहिल्या टप्प्यात दोन लाख मिळकतींची नोंद शक्य असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

“महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळेच मिळकतींची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे वर्षाला शेकडो कोटी रुपयांचा कर बुडत आहे. सर्व मिळकतींची पाहणी करावी,” अशी मागणी महापालिका काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III