Pune Chicken Price : चिकनच्या दरात वाढ; मासळी, मटणचे दर स्थिर

एमपीसी न्यूज – मासळी, मटणचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत  स्थिर असून, मागणी वाढल्याने चिकनच्या दरात 10 रुपयांनी वाढ झाली आहे. इंग्लिश अंड्यांच्या शेकड्याच्या दरात 25 ते 30 रुपयांनी घट झाली आहे.

 

गणेश पेठेतील मासळीबाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळीची सुमारे 8 ते 10 टन, खाडीची सुमारे 200 ते 400 किलो तर नदीच्या मासळीची 1  टन आवक झाली. तर, आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे 7  ते 8 टन आवक झाली असल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) :
पापलेट : कापरी : 1000-1400, मोठे 1400, मध्यम : 700-900, लहान 440- 550, भिला :  360-400, हलवा : 400-440, सुरमई : 400, रावस : लहान 480,  मोठा : 750, घोळ : 600, भिंग : 360, करली : 280-320, करंदी : सोललेली 400, पाला :  1200-1400, वाम :  480-550, ओले बोंबील : 140-160, कोळंबी लहान : 280, मोठे 360- 480, जंबोप्रॉन्स : 1000-1200,  किंगप्रॉन्स : 650, लॉबस्टर : 1000-1200, मोरी : 280, मांदेली :140- 160, राणीमासा : 200, खेकडे  : 240, चिंबोर्‍या : 400-480.

खाडीची मासळी :
सौंदाळे : 280, खापी : 240, नगली : लहान 360 मोठी 600, तांबोशी : 400, पालू : 200, लेपा : 160,  शेवटे : 200, बांगडा : लहान 240 , मोठे 280-320, पेडवी : 100, बेळुंजी : 160,  तिसर्‍या : 280,  खुबे : 160, तारली : 160

नदीची मासळी :
रहू : 160, कतला : 200, मरळ : 480 शिवडा : 240, खवली : 240, आम्ळी : 120, खेकडे : 220-240 वाम : 550-600

चिकन :
चिकन : 190, लेगपीस : 230 जिवंत कोंबडी : 150, बोनलेस : 290. अंडी : गावरान : शेकडा : 730 डझन : 96 प्रति नग :8, इंग्लिश : शेकडा : 545 डझन : 72 प्रतिनग : 6.

मटण :
बोकडाचे : 640 बोल्हाईचे : 640 खिमा : 640, कलेजी : 640.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.