Pune News : ‘राईज एन शाईन’चा 1400 कुटुंबियांना मदतीचा हात

एमपीसीन्यूज : कोरोना विषाणूच्या साथीमुळे तसेच लॉकडाउनमुळे सामान्य कुटुंबाची परवड होत आहे.   त्यात रोजगार बंद असल्यामुळे हातावर पोट असलेल्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. अश्या या परिस्थितीचा सामना करणाऱ्या थेऊर येथील  गरजू कुटुंबियांना टिश्यू कल्चर क्षेत्रात काम करणारी अग्रगण्य कंपनी राईज एन शाईन बायोटेक बायोटेक प्रा. लि. या कंपनीने मदतीचा हात दिला.

गोरगरीब व हातावर पोट भरणाऱ्या सुमारे 1400 कुटुंबियांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. कंपनीच्या संचालिका डॉ. भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते कुटुंब प्रमुखांना किट वाटप करण्यात आले. यामध्ये एक महिना पुरेल इतके तांदूळ, तेल, डाळी व किराणा साहित्याचा समावेश होता.

गरजू नागरिकांनी सोशल डिस्टेन्सिग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करीत सुरक्षा व खबरदारी घेत कीट स्वीकारले व राईज अँड शाईन कंपनीचे लाभार्थ्यांनी आभार मानले. यावेळी या कंपनीतील कामगारांना ही अन्न धान्य किट चे वाटप केले होते.

डॉ. रोहिणी सोमनाथ पाटील व  यशश्री यशराज पाटील आणि कंपनीच्या व्यवस्थापन प्रतिनिधींच्या उपस्थिती हा कार्यक्रम संपन्न झाला.

‘राईज एन शाईन बायोटेक कंपनी माध्यामधून हे सामाजिक उपक्रम सतत राबविले जातात. आपण एक दुसऱ्याला कायमच मदतीचा हात दिला पाहिजे. गरजवंतांना, उपेक्षित घटकांना मदतीसाठी इतरांनी सुद्धा प्रोत्साहन द्यावे’, असे आवाहन डॉ. भाग्यश्री पाटील यांनी यावेळी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.