Pune News: फळांना मागणी असल्याने भावात वाढ

कलिंगडाच्या भावात किलोमागे 3 रुपये, खरबूज 5 रूपये, सिताफळ 20 रूपये, पपईच्या भावात प्रतिकिलोमागे 5 रुपये आणि लिंबाच्या गोणीमागे 50 रुपयांनी तर संत्रीच्या भावातही दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.

एमपीसी न्यूज – मार्केटयार्ड फळबाजारात सर्व प्रकारच्या फळांची आवक चांगल्या प्रमाणात होत आहे. फळांना मागणी असल्याने कलिंगड, खरबुज , पपई, लिंबू, सिताफळ, संत्री यांच्या भावात वाढ झाली आहे. कलिंगडाच्या भावात किलोमागे 3 रुपये, खरबूज 5 रूपये, सिताफळ 20 रूपये, पपईच्या भावात प्रतिकिलोमागे 5 रुपये आणि लिंबाच्या गोणीमागे 50 रुपयांनी तर संत्रीच्या भावातही दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागणी अभावी डाळिंबाच्या भावात 5 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

रविवारी (दि.6) येथील बाजारात केरळ येथून अननस 1 ट्रक, मोसंबी 70 ते 80 टन, संत्री 4 टन, डाळिंब 100 ते 150 टन, पपई 25 ते 30 टेम्पो, लिंबे दीड ते दोन हजार गोणी, कलिंगड 15 ते 20 टेम्पो, सीताफळ 8 ते 10 टन, खरबुजाचे 15 ते 20 टेम्पो, चिक्कू 500 बॉक्स इतकी आवक झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

फळांचे भाव – लिंबे (प्रतिगोणी) : 150-300, अननस (डझन) : 70-270, मोसंबी : (3 डझन) : 120-230, (4 डझन) : 30-100, संत्रा : (3 डझन) : 200-350, (4 डझन) : 60-200, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 20-80, गणेश : 5-25, आरक्ता 20-40. कलिंगड : 5-15, खरबूज : 10-30, पपई : 5-20, चिक्कू : 100-500, पेरू : 250-400, सीताफळ : 100-140.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.