Pune News: झोपडपट्टीत कचरा गोळा करण्यासाठी वेचकांना प्रती घरटी 20 रूपये मिळणार

कचरा वेचकांनी विविध मागण्यांसाठी 14 ऑगस्टपासून शहरात आंदोलन सुरू केले होते.

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील स्वच्छ संस्थेच्या कचरा वेचकांना झोपडपट्टीतील कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेकडून 10 रुपयांऐवजी 20 रूपये मिळणार आहे. त्याला मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले असतानाही कचरावेचक जीव धोक्यात घालून घरोघरी जाऊन कचरा गोळा करीत आहेत. कचरा वेचकांनी विविध मागण्यांसाठी 14 ऑगस्टपासून शहरात आंदोलन सुरू केले होते.

_MPC_DIR_MPU_II

शहरातील झोपडपट्टीतील कचरा गोळा करण्यासाठी 30 रूपये प्रती घरटी मिळावी, ही मागणी कचरा वेचकांनी केली होती. स्वच्छ संस्थेच्या माध्यमातून 3 हजार 665 कचरा वेचक आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये सुमारे 635 कचरा वेचक दररोज कचरा गोळा करण्याचे काम करतात.

पुणे महापालिकेच्या गलिच्छ वस्ती निर्मुलन विभागातर्फे शहरातील सर्व कचरा वेचकांना दोन लाखाचे विमा कवच देण्याबाबतची कार्यवाही चालू असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.