Pune News: पुण्यात मेट्रोचा पूल कोसळल्याची अफवा; सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मेसेज व्हायरल

महामेट्रोतर्फे पुणे शहरात पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी अशा 2 मेट्रो मार्गाचे काम जोरात सुरू आहे. कोणीतरी खोडसाळपणा करून पुण्यात मेट्रोचा पूल कोसळल्याची अफवा पसरविली आहे.

एमपीसी न्यूज – पुण्यात मेट्रोचा पूल कोसळल्याची अफवा पसरविण्यात आली आहे. सोशल मीडियावर यासंबंधीचे मोठ्या प्रमाणात मेसेज व्हायरल झाले आहे. त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

मेट्रोचा निर्माणाधिण पूल कोसळल्याची छायाचित्रे समाज माध्यमातून, विशेषतः #WhatsApp वरुन मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून ती छायाचित्रे पुण्यातील असल्याचा दावा केला गेला आहे. मात्र, या दाव्यात कोणतेही तथ्य नसून अशी कोणतीही घटना पुण्यात घडलेली नाही.


मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी महापौरांचे बोलणे झाले असून हा प्रकार पुणे शहरातील नाही. आपल्यालाही असे फोटोज आणि मेसेज आले असल्यास आपण फॉरवर्ड करु नका, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

महामेट्रोतर्फे पुणे शहरात पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी अशा 2 मेट्रो मार्गाचे काम जोरात सुरू आहे. कोणीतरी खोडसाळपणा करून पुण्यात मेट्रोचा पूल कोसळल्याची अफवा पसरविली आहे. त्यानंतर यासंबंधीचे मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आले. त्याची कोणतीही खात्री करण्यात आली नाही. त्यामुळे पुण्यात असा मेट्रोचा कोणताही पूल कोसळला नाही. त्यामुळे पुणेकरांनी सातर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.