Pune News : पुण्यात स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर राज ठाकरे यांची जाहीर सभा?

एमपीसी न्यूज – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. 21  ते 28 मे या दरम्यान ही सभा होणार आहे. मनसेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी यासाठी पुणे पोलीस आयुक्तांकडे परवानगी देण्याबाबत अर्ज केला आहे. 

राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर औरंगाबाद येथे त्यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात जाहीर सभा घेणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं. त्यानुसार आता राज ठाकरे यांची पुढची सभा पुण्यात होणार असल्याचं स्पष्ट झालंय.

 

मनसेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर त्यांच्या नावाने एक पत्र सध्या पोलिस आयुक्तांना पाठवण्यात आले. यामध्ये त्यांनी राज ठाकरे यांच्या पुण्यातील जाहीर सभेसाठी परवानगी मागितली आहे. येत्या 21 ते 28 मे यादरम्यान पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर सभेसाठी परवानगी मागितली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेला पोलीस परवानगी देणार का? त्यांची ही सभा पार पडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे?

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.