Pune News : भाजपा सहकार आघाडीच्या शहराध्यक्षपदी सचिन दांगट

एमपीसी न्यूज – वारजेतील स्वीकृत नगरसेवक सचिन दशरथ दांगट यांची भाजपा सहकार आघाडीच्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप शहराध्यक्ष तथा माजी आमदार जगदीश मुळीक यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले आहे.

याप्रसंगी सहकार आघाडीचे शहराध्यक्ष संघटनमंत्री रवि अनासपुरे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, दीपक पोटे, दीपक नागपुरे, प्रवक्ते धनंजय जाधव, विकास लवाटे,दक्षिण भारतीय आघाडीचे राजेश पिल्ले आदींसह सहकार आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दांगट यांना 2017 साली झालेल्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्र. 32 मधून पराभवाला सामोरे जावे लागले होते. भाजपच्या वतीने त्यांना आता नवीन धुरा सोपवण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.