Pune News : दक्षिण कमान मुख्यालयात कारगिल विजय दिवसानिमित्त हुतात्मा वीरांना वंदन

एमपीसी न्यूज – दक्षिण कमान मुख्यालयात कारगिल विजय दिवसानिमित्त हुतात्मा वीरांना वंदन करण्यात आले. ले. जनरल जेएस नैन यांनी कारगिल शहिदांना श्रद्धांजली अर्पण करत वीरांना वंदन केले. पुण्यातील राष्ट्रीय युद्ध स्मारक याठिकाणी आज (सोमवारी) हा कार्यक्रम पार पडला.

29 जुलै 1999 रोजी भारतीय सेनेने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. यावेळी निवृत्त मेजर जनरल ए. के. हुक्कूर यांनी देखील हुतात्मा वीरांना वंदन केले.

‘कारगिल याठिकाणी शौर्य दाखविलेले जवान आपल्यासाठी आणि देशासाठी मोठा प्रेरणास्रोत आहेत. त्यांनी दाखविलेले शौर्य आणि केलेला पराक्रम कधीही न विसरता येणारा आहे.’ असे मत ले. जनरल जेएस नैन यांनी यावेळी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.