Pune News : भुजबळांना दोषमुक्त केल्याबद्दल समता परिषदेतर्फे आनंदोत्सव

एमपीसी न्यूज – दिल्लीतील महाराष्ट्र सदन नूतनीकरण कथित गैरव्यवहार प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मोठा दिलासा दिला असून छगन भुजबळ, त्यांचे पुतणे पंकज भुजबळ, तन्वीर शेख, ईरम शेख, संजय जोशी आणि गीता जोशी यांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे.

या निर्णयानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर ढोलताशांच्या गजरात या निर्णयाचे स्वागत केले. पुण्यातही अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दगडूशेठ गणपती मंदीर येथे पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा मंजिरी धाडगे, पुणे विभाग अध्यक्ष प्रितेश गवळी, पुणे शहर अध्यक्ष पंढरीनाथ बनकर, अध्यक्षा वैष्णवी सातव, कार्याध्यक्ष गौरी पिंगळे, विभागीय सहसंघटक शिवराय जांभुळकर, कोथरुड विधान संभा अध्यक्ष प्रदिप घुले, कसबा विधानसभा अध्यक्ष रवी लडकत, पुणे कार्याध्यक्ष सागर दरवडे, संघ उपाध्यक्ष सुधीर होले, संघटक महेश बनकर, वृषाली वाडकर, पल्लवी टोले, रोहिणी रासकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेकडोंच्या संख्य़ेने उपस्थित होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत या विजयाचे स्वागत करण्यात आले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.