Pune News : दोन महिन्यात संभाजी बिडीचे नाव बदलणार -साबळे वाघिरे कंपनीचा निर्णय

रजिस्ट्रेशन लवकर आले तर नावातील बदलही लवकरच केला जाईल, अशी माहिती साबळे वाघिरे कंपनीच्या वतीने कंपनीचे संचालक संजय वाघिरे आणि विलास साबळे यांनी आज, पत्रकार परिषदेत दिली.

एमपीसीन्यूज : शिवप्रेमींच्या मागणीचा आदर करुन संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार बिडीच्या उत्पादनासाठी चार नवीन नावे रजिस्ट्रेशनसाठी पाठविण्यात आली आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यात संभाजी बिडीचे नाव बदलण्यात येईल. रजिस्ट्रेशन लवकर आले तर नावातील बदलही लवकरच केला जाईल, अशी माहिती साबळे वाघिरे कंपनीच्या वतीने कंपनीचे चेअरमन संजय साबळे  यांनी आज, पत्रकार परिषदेत दिली.

बिडीचे नाव बदलण्याच्या मागणीसाठी शिवधर्म फाउंडेशन, संभाजी ब्रिगेडसह अन्य संघटनांनी आंदोलन सुरु केले होते. शिवधर्म फाउंडेशनच्यावतीने पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला आंदोलन सुरू केले होते. निवृत्त सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी या आंदोलकांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला होता. शिवप्रेमी विजय आंब्रे उपस्थित होते.

अखेर या आंदोलनाला यश आले असून, तब्बल 80 वर्षांनंतर संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय साबळे वाघिरे कंपनीला घेण्यास या आंदोलकांनी भाग पाडले.

छत्रपती संभाजी महाराजांचे नाव बिडीच्या बदलावर नको, अशी भूमिका व मागणी संभाजी ब्रिगेड अनेक वर्षापासून मागणी करत आहे. याविरोधात आजपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले.

तसेच शिवधर्म फाउंडेशन व अन्य संघटनांनीसुद्धा आंदोलनाचा पवित्रा घेतला. नुकतेच संभाजी ब्रिगेडने पुण्यातील लोकप्रतिनिधींना याबाबत निवेदन देऊन या प्रश्नी आवाज उठविण्याची मागणी केली होती.

अखेर या आंदोलनानंतर आता साबळे वाघिरे कंपनीने संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्वसामान्य नागरिकांच्या जनभावनेचा आदर करुन आम्ही बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे  कंपनीचे संचालक संजय वाघिरे यांनी  सांगितले.

कंपनीचे संचालक संजय वाघिरे,  विलास साबळे, विशाल साबळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष सतीश काळे, पुणे शहराध्यक्ष हर्षवर्धन मगदुम, कार्याध्यक्ष प्रदिप बेलदरे, प्रदिप कणसे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.