Pune News : सँडविक एशियातर्फे गरजू विद्यार्थिनींना अभियांत्रिकीसाठी अर्थसहाय्य

लीला पुनावाला फाउंडेशन बरोबर सामंजस्य करार

एमपीसीन्यूज : पुण्यातील अभियांत्रिकी पदवी घेणाऱ्या गरजू व शैक्षणिक दृष्या हुशार विद्यार्थिनींना अर्थसहाय्य देण्यासाठी सँडविक एशियाने लीला पुनावाला फाउंडेशन (एलपीएफ) सह नवीन सामंजस्य करारावर (एमओयू) वर स्वाक्षरी केली. या करारानुसार, सँडविक एशिया 5 वर्षांत 126 गरजू विद्यार्थीनींना मदत करण्यात यशस्वी होईल.

सॅंडविक एशिया प्रा. लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकारी किरण आचार्य, एलपीएफच्या अध्यक्षा लीला पुनावाला, संस्थापक विश्वस्त फिरोज पुनावाला, सीईओ प्रीती खरे आणि सॅंडविक एशिया प्रा. लि.च्या रिया खंदुरी यावेळी उपस्थित होते.

सॅंडविक कंपनीने शैक्षणिक दृष्ट्या उज्ज्वल आणि आर्थिकदृष्ट्या वंचित मुलींना अभियांत्रिकी पदवी मिळवण्यास सक्षम करण्यास सुरूवात केली. या मुलींना विविध प्रशिक्षण कार्यक्रम आणि उद्योगांच्या प्रशिक्षणाद्वारे मार्गदर्शन केले. जेणेकरून त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्या सुसज्ज बनतील.

यावेळी किरण आचार्य म्हणाले, “शिष्यवृत्ती आणि कौशल्य प्रशिक्षण उपक्रमांतर्गत लीला पुनावाला फाउंडेशनशी संबंधित सॅंडविकला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. एलपीएफच्या या महान कार्यासाठी पुढाकार घेण्याचा आम्हाला अभिमान वाटतो. आमच्या अविरत वचनबद्धतेतून अधिक मुलींचे शिक्षण आणि सबलीकरण करण्याचे आमचे ध्येय आहे.

लीला पुनावाला म्हणाल्या, “सॅंडविकचे आमच्याशी सहकार्य मागील पाच वर्षांपासून आहे आणि आम्ही अभिमानाने सांगतो की हा भागीदारीच्या भावनेने बांधलेला एक महत्त्वाचा संबंध आहे. आम्ही आमच्या 25 वर्षांच्या यशस्वी कार्यकालाचा उत्सव साजरा करताना सॅंडविक सारख्या आमच्या भागीदारांचे आभार मानतो. आम्ही मुलींना आर्थिक सहाय्यते बरोबरच एक समग्र दृष्टीकोन प्रदान करण्याच्या उद्देशाने कार्यरत आहोत. ज्यामध्ये मुलींना घडविले जाते, त्यांचा आत्मविश्वास वाढविला जातो, त्यांना रोजगाराच्या कौशल्यांबद्दल प्रशिक्षण दिले जाते. तसेच त्यांना त्यांच्या आवडीच्या करियर साठी तयार केले जाते. ”

आर्थिक मदतीसाठी इच्छुक गरजू विद्यार्थिनींनी 020- 27224265 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन लीला पुनावाला फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.