Pune News : संजय चोरडिया यांचा ‘इंडियन अचिव्हर्स अवार्ड’ ने सन्मान

एमपीसी न्यूज-शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘आयएफआयई’तर्फे  सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना ‘इंडियन अचिव्हर्स अवार्ड’ प्रदान करण्यात (Pune News) आला. केंद्रीय माहिती व प्रसारण तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना सन्मानित करण्यात आले.नवी दिल्ली येथे हा कार्यक्रम पार पडला.
प्रशासन, क्रीडा, संस्कृती, शिक्षण, आरोग्य, उद्योग, इनोव्हेशन, सामाजिक कल्याण व राष्ट्रीय एकात्मकता आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.इंटरॅक्टिव्ह फोरम ऑन इंडियन इकॉनॉमी (आयएफआयई) आणि पॉवर कॉरिडॉर्स मॅगझीन यांच्या वतीने या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी ‘आयएफआयई’चे चेअरमन ऍड. नंदन झा,  अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंग लालपुरा, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते झफर इस्लाम यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया हे  एक उत्साही, शिक्षणतज्ज्ञ, ग्लोबल कोच व सामाजिक नेते म्हणून ओळखले जातात . दूरदृष्टी व सामाजिक जाणिवेतून समाजातील (Pune News) सर्व स्तरांतील घटकांना परवडणाऱ्या दरात सर्वांगीण विकासाचे शिक्षण देण्यासाठी  चोरडिया काम करत आहेत.
तसेच विश्वात शांतता व सहिष्णुता नांदावी, यासाठी प्रयत्नशील आहेत. विविध उद्योग आणि तंत्रज्ञानाधारित प्रकल्पांशी जोडलेल्या चोरडिया यांची इंडियन टेक मॅग्नेट अशीही ओळख आहे. त्यांच्या धोरणी, समर्पित व अथक परिश्रमामुळे सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स यशाची शिखरे पादाक्रांत करत असून, अशा पुरस्कारांनी त्याची दखल घेतली जाते.

याविषयी बोलतोना चोरडिया म्हणाले, “सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स यंदा रौप्य महोत्सव साजरा करत असून, अशा पुरस्कारामुळे आणखी जोमाने काम करण्याची उमेद मिळते. समाजाच्या, देशाच्या प्रगतीत योगदान देऊ शकणारे युवक घडविण्यासाठी सर्वांगीण विकासाचे, जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी सूर्यदत्त सातत्याने प्रयत्नशील आहे. उदयोन्मुख क्षेत्रातील नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम, तंत्रज्ञानाधारित शिक्षण व नवीन शिक्षण धोरणाला (Pune News) अनुसरून, तसेच आधुनिक शिक्षणाला मूल्यांची जोड हवी, हे ओळखून ज्ञानदान करताना मूल्यांचे, तत्वांचेही शिक्षण येथे दिले जाते.”
 भारताचे माजी सरन्यायाधीश के. जी. बालकृष्णन, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश ज्ञान सुधा मिश्रा यांच्यासह माजी सनदी अधिकारी, ज्येष्ठ पत्रकार यांच्या ज्युरींकडून या पुरस्कारांची निवड करण्यात येते. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना समाजासाठी सर्वांगीण विकासाचे शिक्षण (Pune News) याकामी दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.