Pune News : संजय राऊत हे तर सर्व राष्ट्रांचे प्रमुख : चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज : जगामध्ये 182 देश आहेत आणि त्य सर्व देशाचे राष्ट्रप्रमुख संजय राऊत आहेत. एवढ्या वर्षानंतर या जगामध्ये संजय राऊतांसारखे व्यक्तिमत्व निर्माण झाले असून त्यांच्याकडे फक्त भारतातल्या नव्हे, तर महाराष्ट्रातल्या नाही. तर संपूर्ण जगातल्या विषयावर मत आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी मी काय बोलणार, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

_MPC_DIR_MPU_II

पुण्यातील बोपोडी येथील एका कार्यक्रमास चंद्रकांत पाटील हे एका कार्यक्रमास आले होते. त्यानंतर त्यांनी प्रश्नावर भूमिका देखील मांडली.

पाटील म्हणाले, बेळगाव येथील गावाचा समावेश –
महाराष्ट्रात समावेश करण्याच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले, तेथील अनेक गावात कन्नड भाषिक अधिक आहे. ती गावे स्वाभाविकपणे कर्नाटकमध्ये केली आहे. त्यामुळे बेळगावसहित 800 गाव जी अशी आहे. ती महाराष्ट्रात आली पाहिजेत. ही भारतीय जनता पक्षाची पहिल्यापासून भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.