Pune News : पानिपत शौर्यदिनी ‘सरसेनापती हंबीरराव’ टीमकडून वीरांना मानवंदना

एमपीसी न्यूज: 260व्या पानिपत शौर्यदिनी ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाच्या टीमकडून वीरांना मानवंदना देण्यात आली. शनिवार वाड्यावरील रणांगणातील माती असलेल्या कलशाचे पूजन करून पानिपतच्या रणसंग्रामात हुतात्मा झालेल्या वीरांना (दि. 14) रोजी मानवंदना दिली.

या प्रसंगी ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक प्रविण तरडे, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते, चित्रपटाचे निर्माते शेखर मोहिते पाटील, सौजन्य सूर्यकांत निकम, धर्मेंद्र बोरा, यांच्यासह संदीप मोहिते पाटील, गणेश सातपुते, तळबीडचे सरपंच नाना मोहिते पाटील उपस्थित होते.

यावेळेस चित्रपटातील अभिनेते रमेश परदेशी, सुनील अभ्यंकर, जयेश संघवी, विनोद सातव यांनी वीरांना मानवंदना दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास अभ्यासक सौरभ कर्डे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रसाद भारदे यांनी केले

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.