Pune News : सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी ससूनच्या डॉक्टरांचे कामबंद आंदोलन

एमपीसीन्यूज  : सातवा वेतन आयोग लागू व्हावा, कोविड योद्धा डॉक्टरांचा सन्मान व्हावा, अस्थायी प्राध्यापकांना नियमित करावे, या आणि इतर मागण्यांसाठी ससून रुग्णालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरांनी सोमवारपासून  संप पुकारला आहे. हेे सर्व डॉक्टर  सामूहिक रजेवर गेले आहेत.

संपावर गेलेल्या डॉक्टरांनी प्रामुख्याने दोन मागण्या मांडल्या आहेत. सहाय्यक डॉक्टर आणि प्राध्यापक हे मागील सहा महिन्यापासून सातवा वेतन आयोग लागू करावा आणि कोविड योद्धा डॉक्टरांचा सन्मान करावा  यासाठी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करत आहेत.

पण त्यांच्या या मागण्यांकडे सतत दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे हे आंदोलन करण्याची वेळ आल्याचे आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी सांगितले. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आमचे हे काम बंद आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचे या डॉक्टरांनी  सांगितले.

ससून रुग्णालय हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि सर्वाधिक रुग्णांवर उपचार करणारं रुग्णालय म्हणून ओळखले जाते. संपूर्ण पुणे जिल्ह्यासह इतर भागातूनही या रुग्णालयात उपचारासाठी रुग्ण येत असतात.

सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरांच्या या कामबंद आंदोलनामुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या डॉक्टरांचे हे आंदोलन थांबवण्यासाठी प्रशासन नेमक्या काय उपाययोजना करते हे पहावे लागेल..

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.