Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘पीएमपीएमएल’ बससेवेचा पुनःश्च हरिओम.!

एमपीसी न्यूज – विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची सोय लक्षात घेता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आजपासून (1 जुलै) पीएमपीएमएल बससेवेची पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात साधारण आठ ते दहा वर्षापूर्वी बससेवा होती मात्र पुरेश्या प्रवासी संख्येअभावी बंद झाली होती. मात्र विद्यार्थी व कर्मचारी यांच्या सोयीसाठी प्रा.डॉ. नितीन करमळकर यांच्या प्रयत्नातून या बससेवेचा पुन्हा शुभारंभ करण्यात आला आहे.

पीएमपीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप यांनी विद्यापीठाच्या विनंतीला मान्यता देत ही बससेवा आजपासून सुरू केली आहे.

या बससेवेचा श्रीगणेशा आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे, डॉ मनोहर चासकर, समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रुती तांबे, मराठी विभागप्रमुख डॉ. प्रभाकर देसाई तसेच बसचालक व वाहक उपस्थित होते. यावेळी अभिनेत्री गिरीजा ओक यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

भारती विद्यापीठ ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व डेक्कन ते पुणे विद्यापीठ या दोन बस यावेळी सुरू करण्यात आल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोज याच्या चार फेऱ्या होणार आहेत, कालांतराने त्या वाढविण्यात येणार आहेत.

यापूर्वी विद्यापीठ गेटपर्यंत बस होत्या मात्र विद्यार्थी व कर्मचारी यांची मागणी लक्षात घेत ही बससेवेची मागणी केली होती. यामुळे अनेकांचा विद्यापीठात येण्याचा प्रवास सुखकर होईल.
प्रा. डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.