_MPC_DIR_MPU_III

Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 27 डिसेंबरला सेट परीक्षा

एमपीसीन्यूज : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यात अधिव्याख्याता पदासाठी घेण्यात येणारी सेट परीक्षा दि. 27 डिसेंबर 2020 रोजी आयोजित करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यात अधिव्याख्याता पदासाठी घेण्यात येणारी व दि. 28 जून 2020 रोजी आयोजित करण्यात आलेली सेट परीक्षा कोविड – १९ महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्ववभूमीवर पुढे ढकलण्यात आली होती.

आता ही परीक्षा दि. 27  डिसेंबर 2020 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेबाबतची माहिती http://setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.