Pune Crime News : शाळकरी मुलीचा पाठलाग करून धमकावले, गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज-कात्रज परिसरात एका शाळकरी मुलीचा टोळक्याने ( Pune Crime News ) वारंवार पाठलागकरून तिचा विनयभंग केला. तर, तिला मोबाईल नंबर व इन्स्टा आयडी देण्याची मागणी केली. तिने नकार दिल्यानंतर अश्लील टाँट मारून तिच्या आत्येभावाला या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली.

 

Pune Crime News : परदेशी महिलांना नोकरीवर ठेवून सुरू होता वेश्याव्यवसाय

 

याप्रकरणी 15 वर्षीय मुलीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, आठ ते दहा जणांच्या टोळक्यावर गुन्हा नोंद केला आहे. चार ते पाच दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. यातील एक आरोपी मुलीच्या परिचयाचा आहे.

 

परंतु, त्याचे एकतर्फी प्रेम असून, तो वारंवार मुलीचा पाठलाग करत होता. तिला मोबाईल क्रमांक व इन्स्टाग्राम आयडी देण्याची मागणी करत होता. पण, मुलीने त्याला नकार दिला. त्यावेळी या टोळक्याने तरुणीला अश्लील भाषेत टाँटिंग केली. तर, तरूणीच्या आत्येभावाला देखील या रागातून ( Pune Crime News ) बेदम मारहाण केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.