Pune News : ‘संवाद तरुणांचा तरुणांसाठी’ चर्चासत्राचे आयोजन

0

एमपीसी न्यूज : तरुणांना रोजगाराची वाट दाखवून त्यांच्या स्वप्नांना नवे पंख देण्यासाठी सुरेंद्र पठारे फाऊंडेशन आणि युथ फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ‘संवाद तरुणांचा तरुणांसाठी’ ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (दि. 17) रोजी सायंकाळी 4 वाजता, व्हीक्टोरीअस स्कूल, खराडी येथे हे चर्चासत्र आयोजित केले आहे.

या चर्चासत्रामध्ये निवृत्त कमांडो श्यामराज इ. व्ही, युवा उद्योजक व लेखक शरद तांदळे व व्हीक्टोरेअस स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सॉबिन घोष मार्गदर्शन करणार आहेत. या माध्यमातून करण्यात आलेल्या या प्रयत्नाने अनेक तरुणांना आपल्या कौशल्याप्रमाणे रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी योग्य दिशा, प्रेरणा व मार्गदर्शन मिळेल, असा विश्वास आयोजक युवा नेते सुरेंद्र पठारे यांनी व्यक्त केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.