Pune News : ज्येष्ठ नृत्य गुरु पं. मनीषा साठे यांचा सत्तराव्या वाढदिवसानिमित्त सत्कार

एमपीसी न्यूज : कथक नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल (Pune News) ज्येष्ठ नृत्य गुरु पं.मनीषा साठे यांचा सत्कार विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर,पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. मनीषा नृत्यालय परिवारच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम 27 मे रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (कोथरूड) येथे सायंकाळी साडे पाच वाजता झाला.

या कार्यक्रमात पं.मनीषा साठे यांनी ‘नृत्यार्पिता’ हे बहारदार एकल नृत्य सादरीकरण केले. त्यांना निखिल पाठक, राजीव तांबे, सुनील अवचट, वल्लरी आपटे यांनी साथसंगत केली. पं.मनीषा साठे यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त या सर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अशोक वैशंपायन गुरुजी यांनी वेद मंत्रातून अभिष्टचिंतन केले.

शांभवी दांडेकर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. गौरी स्वकुळ यांनी सूत्रसंचालन केले. ‘नृत्यार्पिता’ सादरीकरणातून पं.मनीषा साठे यांनी प्रारंभी शिववंदना, ताल, नायिका भेद, द्रूत त्रिताल तसेच ‘मोहे मना लाग्यो छंद’ हे भजन सादर केले. या बहारदार सादरीकरणाला रसिकांनी टाळयांच्या कडकडाटात , तसेच उभे राहून दाद दिली.

त्रिताल नंतर मनीषा यांना आवडणारा गणेश ताल बारा मात्रांमध्ये सादर केला. त्यांचे गुरू बाळासाहेब गोखले यांच्या बंदिशी देखील सादर केल्या. गोपीकृष्ण यांच्या पारंपारिक तत्कार वरील पारंपारिक रचना सादर करताना त्यांनी प्रभुत्व सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पं.मनीषा साठे यांचा सत्कार करण्यात आला. पं. साठे यांच्या शिष्यांनी भेटवस्तू त्यांना प्रदान केली. विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या भाषणात पं.मनीषा साठे यांच्या ध्यास (Pune News) आणि समर्पितयोगदानाचे कौतुक केले. पं.साठे यांनी या सत्काराला उत्तर दिले.

शांभवी दांडेकर, पूनम गांधी, शिल्पा दातार, तेजस्विनी साठे, वल्लरी आपटे या शिष्यांनी औक्षण केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मधुरा आफळे, निखिल फाटक यांनी पं. मनीषा साठे यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यातून त्यांच्या व्यक्तीमत्वाचे, योगदानाचे आणि नृत्यशैलींचे अनेक पैलू उलगडले.

Pune : फडणवीस यांनी दिलेले सदर्भ अर्धवट ज्ञानावर आधारित – गोपाळ तिवारी

ख्यातनाम शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टीकेकर, ज्येष्ठ कथक नृत्यांगना शमा भाटे, ज्येष्ठ भरतनाटयम नृत्यांगना डॉ. सुचेता भिडे-चापेकर, योगेश गोगावले, अंकुश काकडे, पुनीत जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.