Pimpri News : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लीलावती एकनाथ कहाणे यांचे निधन

एमपीसी न्यूज – संभाजीनगर-शिवतेजनगर परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लीलावती एकनाथ कहाणे (वय 65 वर्षे) यांचे आजारपणामुळे दुःखद निधन झाले.

त्यांनी शहर राष्ट्रवादी काँगेसमध्ये सरचिटणीस, विभाग महिला अध्यक्षा आदी पदे भूषवली होती. त्याच प्रमाणे तिळवण तेली समाज संघटनेच्या महिला शहराध्यक्षा म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले होते. विविध महिला बचत गट व भजनी मंडळांच्या माध्यमातून त्यांनी महिलांचे संघटन केले. गणेशोत्सवातून समाजकार्यात त्या हिरीरीने सहभागी होत असत.

त्यांच्या पश्चात पती, दोन मुले , मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.