Pune News : सीरम इन्स्टिट्यूटच्या बीसीजी प्लान्ट इमारतीला आग; कोव्हिशिल्ड प्लान्ट पूर्णत: सुरक्षित

एमपीसी न्यूज : संपूर्ण जगासाठी महत्त्वाची संस्था ठरत असलेल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या मांजरी येथील बीसीजी प्लान्ट इमारतीला दुपारी एकच्या सुमारास आग लागली आहे. परंतु कोव्हिशिल्ड उत्पादन प्रकल्प पूर्णत: सुरक्षित आहे. तसेच दुपारी 4.10 वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून सध्या कूलिंगचे काम चालू असल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

मांजरी येथील टर्मिनल 2 बीसीजी प्लान्ट इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याला आग लागल्यामुळे धुराचे लोट येत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर घटनास्थळी पोलीस प्रशासन आणि अग्निशमन विभागाच्या 10 गाड्या पोहोचल्या. त्याठिकाणी आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमनच्या जवानांनी तीन जणांना सुखरुप बाहेर काढत सुरक्षित स्थळी आणले. आगीचे नेमके कारण अस्पष्ट असले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अग्निशमन जवानांकडून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान, कोव्हिशिल्ड लस उत्पादन प्रकल्प टर्मिनल 1 ला आगीचा कुठलाही धोका पोहोचला नाही. आग केवळ टर्मिनल 2 बीसीजी प्लान्ट इमारतीपुरती मर्यादित आहे. कोव्हिशिल्ड लसीचा साठा सुरक्षित असून घाबरण्याची व काळजी करण्याचे काही कारण नसल्याचे सीरम इन्स्टिट्यूटच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.