Pune News : हडपसर येथे जंबो कोविड सेंटर उभारा – शिवाजी आढळराव पाटील

एमपीसी न्यूज – हडपसर येथे जंबो कोविड सेंटर व्हावे, यासाठी शिवसेना उपनेते शिवाजी आढळराव पाटील यांनी पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेण्यात आली. हडपसर ग्लायडिंग सेंटर येथे गेल्या आठवड्यात आयुक्त विक्रम कुमार यांनी शिवसेना पदाधिकारी यांच्या समवेत पाहणी केली होती.

या ठिकाणी काही तांत्रिक अडचणी असल्याने यावर चर्चा करण्यात आली व ग्लायडिंग सेंटर व्यतिरिक्त इतर कुठे ही हडपसर परिसरात जम्बो कोविड सेंटर उभारले तरी चालेल. हड़पसर येथे जम्बो कोविड सेंटर ची अत्यंत गरज असून नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत असल्याने लवकरात लवकर हडपसर येथे पुणे महानगरपालिकेच्या वतीने जम्बो कोविड सेंटर उभारावे अशी आग्रही मागणी शिवसेनेची आहे.

तसेच हडपसर परिसरात प्रामुख्याने माळवाडी, पंधरा नंबर, महादेवनगर व इतर भागात देखील लसीकरण केंद्र लवकरात लवकर सुरु करुण लसीचा योग्य तो पुरवठा करण्यात यावा हि देखील मागणी करण्यात आली. या सर्व विषयी आयुक्तांनी स्वतः सकारात्मकता दर्शवली.

शिवसेना उपनेते मा. खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या समवेत शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देशमुख, नगरसेविका शहर संघटिका संगीता ठोसर, नगरसेवक प्रमोद भानगिरे, उपशहर प्रमुख समीर तुपे, विधानसभा प्रमुख राजेंद्र बाबर, विधानसभा समन्वयक तानाजी लोनकर, विभाग प्रमुख प्रशांत पोमण, उपविभाग प्रमुख महेंद्र बनकर हे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.