Pune news: शरद पवार यांनी घेतले सिरम इन्स्टिट्यूटमधील ‘हे’ इंजेक्शन

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज (शुक्रवारी) पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. कोरोनाच्या लसीची माहिती घेतली.  मी आज सिरम इन्स्टिट्यूटला जाऊन प्रतिकारशक्ती वाढण्यासाठीचे इंजेक्शन घेतले.  माझ्यासोबत माझ्या स्टाफने देखील घेतल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना लसची निर्मिती केली जात आहे. लस कधी येणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे. जानेवारी पर्यंत लस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवार यांनी आज सिरम इन्स्टिट्यूटटला भेट दिली. लस निर्मितीची माहिती घेतली. तसेच प्रतिकारशक्ती वाढण्यासाठीचे इंजेक्शन देखील टोचवून घेतले.

माध्यमे माझ्या बाबत काहीही पसरवतात. मी सिरमला जातो. पूनावाला माझे मित्र आहेत वगैरे पण ही कोरोनाची लस नाही. तर, प्रतिकारशक्ती वाढण्यासाठीचे इंजेक्शन आहे. लसीची प्रगती कुठपर्यंत पोहचलीय हे समजून घेण्यासाठी मी तिथं गेलो होतो, असे शरद पवार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.