Pune News : हिंदू धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शर्जील उस्मानीचा जबाब नोंदवला

एमपीसीन्यूज : हिंदू धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा शर्जील उस्मानी बुधवारी दुपारी स्वारगेट पोलिस ठाण्यात जवाब देण्यासाठी हजर झाला होता. त्याचा जबाब नोंदवून घेतल्याची माहिती पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी दिली आहे.

स्वारगेटमधील गणेश कला क्रीडा संकुलात आयोजित एल्गार परिषदेत उस्मानी याने हिंदू धर्माबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्याच्याविरुद्ध स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक त्याच्या मागावर होते.

परंतु, उस्मानी यांनी उच्च न्यायालयात जाऊन दिलासा मिळवला होता. त्यानंतर काल तो स्वारगेट पोलीस ठाण्यात जबाब देण्यासाठी हजर झाला होता. पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.