मंगळवार, जानेवारी 31, 2023

Pune News : “शेवटचा घोट” व “फुलवूया ही वनराई” ने जिंकला “वनराई करंडक”

एमपीसी न्यूज –  नव्या पिढीकडून बळीराजाला जगण्याची नवीन उमेद देत त्याला येणार्‍या संकटावर मात करून आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा संदेश देणार्‍या “शेवटचा घोट” या सौ. सुशीलाबाई वीरकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यानी सादर केलेल्या नाटिकेस वनराई (Pune News) करंडक मिळाला. तसेच विद्यार्थ्यांच्या समूहाने सादर केलेल्या “फुलवूया ही वनराई, वनराईची नवलाई” या गीत नृत्याने रसिकांची मने जिंकली. डी.ई.एस.सेकंडरी शाळेने सादर केलेले या पर्यावरण संवर्धन नृत्यगीतास प्रथम पारितोषिक मिळाले आहे.

Pune News : श्रीराम चरित्राचा अपमान करणार्‍यांना अटक करा, हिंदू संघटनेतर्फे पुण्यात आंदोलन

स्पर्धेची अंतिम फेरी आणि बक्षीस समारंभ नुकताच बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडला. बक्षीस समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे बालकलाकार आर्या घारे, दिग्दर्शक सतीश फुगे, वनराईचे विश्वस्त रोहिदास मोरे, धन्यकुमार चोरडिया, सागर धारिया, सचिव अमित वाडेकर, वनराई पर्यावरण वाहिनी प्रकल्प संचालक भारत साबळे, बॅक टू स्कूल या चित्रपटातील सर्व कलाकार उपस्थितीत होते.

कै. अण्णासाहेब बेहेरे सन्मानचिन्ह, रोख रक्कम, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. स्पर्धेचे परीक्षण ज्योती रावेरकर, जतीन पांडे, किरण तिवारी यांनी केले. कै. इंदिरा बेहेरे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अशोक बेहेरे यांचे या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले. वनराई संस्थेच्या वतीने पुण्यातील शाळांसाठी वनराई पर्यावरण वाहिनी अंतर्गत वनराई करंडक दरवर्षी आयोजीत केला जातो. यंदा हे स्पर्धेचे 20 वे वर्ष आहे. सिंहगड रोड (Pune News) येथील सानेगुरुजी स्मारक स्व. निळू फुले सभागृह येथे करंडकाची प्राथमिक फेरी झाली होती. यावेळी 30 शाळांनी सहभाग घेतला होता.

Pune Crime News : दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

नाटिका विभागात – प्रथम- सौ. सुशीलाबाई वीरकर हायस्कूल, द्वितीय- चंद्रकांत दरोडे माध्यमिक विद्यालय, तृतीय- न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, उत्तेजनार्थ- चं. बा. तुपे साधना विद्यालय, हडपसर आणि एन. सी. एल. इंग्लिश मिडियम प्रायमरी स्कूल यांना परितोषिक मिळाले.

नृत्य विभागात प्रथम- डी. ई. एस. सेकंडरी स्कूल, द्वितीय- मॉडर्न इंग्लिश मेडियम स्कूल, तृतीय- विद्यापीठ हायस्कूल पुणे, उत्तेजनार्थ- आदर्श विद्यालय नातूबाग शाळा आणि महिलाश्रम हायस्कूल, कर्वे नगर यांना परितोषिक मिळाले.

Latest news
Related news