Pune news : 6 महिन्याच्या बाळाची ढाल करत दागिने पळवले

एमपीसी न्यूज-घरात घुसलेल्या दोघांनी सहा महिन्याच्या बाळाची ढाल करत महिलांच्या अंगावरील लाखोचे (Pune news) दागिने पळवले. कोंढवा येथील मिठा नगर परिसरातील चेतना गार्डन सोसायटीत 2 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली.

याप्रकरणी एका साठ वर्षाच्या महिलेने तक्रार दिली असून दोन अज्ञात आरोपी विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News : पुणे महापालिकेतील अधिकाऱ्याची सोशल मीडियावर बदनामी, गुन्हा दाखल

रात्री दहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्यांची सून घरात होत्या. यावेळी तोंड झाकलेल्या अवस्थेत दोन अज्ञात व्यक्ती अचानक घरात शिरले. फिर्यादींच्या हातातील सोन्याच्या बांगड्या ते जबरदस्तीने काढून घेऊ लागले. मात्र फिर्यादी यांनी त्यांना विरोध केला असता फिर्यादी यांचा सहा महिन्याच्या नातवाला मारहाण करण्याची धमकी दिली.

त्यानंतर फिर्यादी यांच्या हातातील (Pune news) सोन्याच्या बांगड्या आणि सुनेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण असे एक लाख 80 हजार रुपयांचे दागिने चोरी केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.