Pune News : कोथरूडमध्ये शिवसेनेतर्फे गणेश मंडळांना सॅनिटायजर स्टॅन्डचे वाटप

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोथरूड परिसरातील पन्नास सार्वजनिक गणेश मंडळांना पुणे महापालिकेतील शिवसेना गटनेते आणि नगरसेवक पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्यातर्फे व श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान(ट्रस्ट) यांच्या सहकार्याने सँनीटायझर स्टँन्डचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी बाळु मोहोळ, किरण मोहोळ, विकास मोहोळ, ऋतिक भोसले, अक्षय कोथमिरे, शुभम फांदे, रवी ढमाले, संतोष बानगुडे, मुकुंद भेलके, दत्ता सुतार, मनोज आल्हाट, रणजित बोराटे, ओंकार सुतार, रोहन गलांडे, दिपक कुल, अभिषेक खोमणे, तेजस मुळीक, प्रसाद गौड, रिंकेश पोळेकर, विशाल आल्हाट हे विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुधीर वरघडे, अनिल भगत, सुमित माथवड, योगेश क्षीरसागर, प्रसाद नारकर,नितीन दुबळे अजय डहाळे, भूषण माथवड यांनी सहकार्य केले.

कोथरूड परिसरातील रिक्षाचालक बांधवांना अन्नधान्य किट तर, पुणे जिल्हा अँम्ब्युलन्स असोसिएशनच्या चालक व सहाय्यकांना पी.पी.ई किट वाटप यापूर्वीच करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील 4 महिन्यांपासून शिवसेनेतर्फे कोथरूड परिसरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. गरजू लोकांना अन्नधान्य वाटप हा कार्यक्रम सातत्याने सुरू आहे.

प्रभाग क्रमांक 12 मधील नागरिकांना ‘अर्सेनिक अल्बम – 30 गोळ्या व मास्क वाटप करण्यात येत आहे.

तसेच, सोसायट्यांना सॅनिटायजर स्टँडचेही वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती पृथ्वीराज सुतार यांनी दिली.

आतापर्यंत जवळपास 3 हजार नागरिकांना ही मदत पोहोचविण्यात आली आहे. कोरोनाच्या संकट काळात कोथरूडकारांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी दक्षता घेण्यात येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.