Pune News : गटारे, ओढे, नालेसफाईच्या भ्रष्टाचाराविरोधात शिवसेनेचं आंदोलन !

एमपीसी न्यूज : महापालिकेच्या वतीने पावसाळी गटारे, ओढे आणि नाल्यांच्या सफाईचे कोट्यवधींचे टेंडर काढले होते. परंतु, या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्यामुळे पुणेकरांना पाण्यात लोटल्याचा आरोप करीत शिवसेनेने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या निषेधार्थ शुक्रवारी आंदोलन केले.

शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्त्वाखाली पुणे महापालिका भवनाच्या प्रवेशद्वारासमोर हे आंदोलन पार पडले. यावेळी नगरसेवक बाळा ओसवाल, अविनाश साळवे, माजी नगरसेविका कल्पना थोरवे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

‘पावसाळी गटारे साफ झालीच पाहीजे’, ‘कोट्यवधींच्या टेंडरमधील पैसे खाणाऱ्यांची चौकशी करा’, अशा घोषणांनी महापालिका परिसर दणाणून सोडला.

यावेळी शहरप्रमुख मोरे म्हणाले, महापालिकेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे टेंडर काढले जाते. परंतु यामध्ये सर्वांनी पैसे खाल्ले. याची सखोल चौकशी झाली पाहीजे. पुणेकरांना गोड बोलून फसविणाऱ्या सत्ताधारी भाजपचा निषेध. तुंबलेली सांडपाणी आणि पावसाळी गटारांची सफाई झाली पाहीजे. नागरिकांना नाहक आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. पुणेकरांना पाण्यात उभे करणाऱ्या सत्ताधाऱ्यांची काम करण्याची मनस्थिती दिसत नाही. त्यांना जागं करण्यासाठी शिवसनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.