Pune News : भाजपच्या विरोधात शिवसेनेचे पुण्यात भीक मांगो आंदोलन 

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेसाठी येणारा खर्च व याचिकेच्या सुनावणीसाठी केलेल्या वकिलांचा खर्चही पुणे महापालिके तर्फे करण्यात येणार आहे. मात्र, याचिका भाजपची आहे, तर खर्च भाजपनेच करावा, यासाठी महापालिकेचा पैसा वापरु नये, यासाठी शिवसेनेने महापालिका भावना समोर आंदोलन केले.

दरम्यान, या ठरावाच्या विरोधात शिवसेनेने पुण्यात आज भीक मांगो आंदोलन केले. याचिका भाजपने दाखल केली आहे. तर खर्च पुणेकरांचा का असा सवाल शिवसेनेने उपस्थित करत आंदोलन केले आहे. राजकीय स्वार्थापोटी दाखल झालेल्या जनहीत याचिकेचा खर्च भाजपच्या नगरसेवकांना करण्याची ऐपत नसल्यामुळे पुणेकर नागरिकांच्या कररूपी पैशातून या याचिकेचा व वकीलांचा खर्च पुणे महापालिकेच्या निधीतून करण्याचा घाट भाजपतील नगरसेवकांचा आहे. यासाठी त्यांनी स्थायी समितीमध्ये यासंदर्भातला ठराव घाईने मंजूर केला, असा आरोपही शिवसेनेने केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.