Pune News : केंद्र शासनाच्या दुटप्पी धोरणाच्या निषेधार्थ शिवसेनेचे सोमवारी जनआक्रोश आंदोलन

एमपीसीन्यूज : पुण्यामध्ये कोविड लस उत्पादन होत असतानाही पुणे शहर व जिल्ह्यामध्ये लसीचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपल्या जीवाशी मुकावे लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारचे दुटप्पी धोरण व महाराष्ट्राला दिली जाणारी सापत्नभावाची वागणूक याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने सोमवारी ( दि. 12) भोर,  वेल्हा,  मुळशी, पुरंदर, हवेली तालुक्यात जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे.

शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख बाबुराव चांदेरे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून यात अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. पुण्यामध्ये कोविड लस उत्पादन होत असतानाही पुणे शहर व जिल्ह्यामध्ये लसीचा तुटवडा निर्माण होत आहे.

_MPC_DIR_MPU_II

त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपल्या जीवाशी मुकावे लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारचे दुटप्पी धोरण व महाराष्ट्राला दिली जाणारी सापत्नभावाची वागणूक यामुळे महाराष्ट्रावर अन्याय होत आहे. याचा निषेध करण्यासाठी केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेनेच्यावतीने सोमवारी ( दि.12) सकाळी 11 वाजता भोर, वेल्हा, मुळशी, पुरंदर, हवेली या तालुक्यांमध्ये भागांमध्ये तीव्र जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे.

या तालुक्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी यांनी आंदोलनात सहभागी व्हावे. आंदोलन करताना कोरोनाची काळजी घेऊन सोशल डिस्टंसिंग व मास्कचा वापर करूनच सॅनिटायझरचा वापर करावा व नियम पाळावेत, असे आवाहनही चांदेरे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.