Pune News : धक्कादायक ! महापलिकेतच अधिकारी अन् कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

0

एमपीसी न्यूज : एकेकाळी देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या पुणे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याचा दावा खोटा ठरला आहे. पुणे महापलिका भवनातील तीन विभागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसह कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने चिंता वाढली आहे.

गेल्या नऊ महिन्यांपासून पुणे महापलिका प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवक सेविकांसह अन्य कर्मचारी कोरोना योद्धे रात्रंदिवस झटत आहेत. तरीही कोरोनाचे शंभर टक्के उच्चाटन झालेले नाही.

_MPC_DIR_MPU_II

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, भारत बायोटेक आणि फायजर कंपन्यांचे लसीकरण मोहीमेचा दुसरा टप्पा संपला आहे. सर्व राज्य सरकारी, महापालिकेसह खासगी रुग्णालयांमधील आरोग्य सेवक अर्थात कोरोना योद्धे यांच्यासह फ्रंट लाईन वर्कर्स यांना लस दिली जात आहे. तिसरा व चवथा टप्पा लवकरच सुरू होणार आहे.

या पार्श्वभुमीवर पुणेकरांकडून कोरोना प्रतिबंधक नियमवली जसे की मास्क, हँड सॅनिटायजर, सोशल फिजीकल डिस्टंसिंगचे पालन करत नसल्याचे चित्र आहे.

शहरासह उपनगरातील कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण संख्या अचानक वाढत आहे. त्यामुळे चिंतेत भर पडत असताना पुणे महापलिका भवनातील तीन विभागांमध्ये उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसह कर्मचारी यांची टेस्ट कोरोना पॉझिटीव्ह आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.