Pune News : धक्कादायक ! शिक्रापूरमध्ये नदीपात्रात काम सुरू असताना महिलेचा मृतदेह आढळला

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर या ठिकाणी असलेल्या वेळ नदीपात्रातून गेलेल्या गटार लाईनचे काम सुरू असताना एका महिलेचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायतचे कर्मचारी गटार लाईनमधून पाणी काढत असताना त्यातून हा मृतदेह बाहेर आला.

मृतदेहाची अवस्था पाहता या महिलेचा खून करून मृतदेह याठिकाणी कुणीतरी आणून टाकला असावा असा संशय व्यक्त केला जातोय शिक्रापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी नोंद करण्यात आली.

शिक्रापूर येथील काही भागांमध्ये गटारांचे पाणी कुटुंब असल्यामुळे ग्रामपंचायतीने हे गटार लाईन स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले होते. यानुसार ग्रामपंचायतीचे काही कर्मचारी जेसीबीच्या सहाय्याने हे गटार साफ करीत असताना त्यातून या महिलेचा मृतदेह बाहेर पडला. या मृतदेहाच्या हाताच्या दोन्ही शिरा कापलेल्या असून गळा देखील तारेने आवळला दिसून येत आहे.

या महिलेचा खून करून मृतदेह त्या ठिकाणी आणून टाकला असावा असा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी या परिसरात आजूबाजूला चौकशी करून या महिलेची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात त्यांना अजून तरी यश आले नाही. शिक्रापूर पोलीस ठाण्यात सध्यातरी अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.