Pune News : पुण्यातील दुकाने शुक्रवारी उघडणार, व्यापाऱ्यांचे राज्य सरकारला खुले आव्हान

एमपीसी न्यूज – राज्य सरकार व पुणे महापालिका प्रशासनाने नव्याने लागू केलेल्या मिनी लॉकडाऊन नियमावलीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे. या निर्णयाविरोधात व्यापारी वर्गांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे.

त्याचाच एक भाग म्हणून पुणे व्यापारी महासंघातर्फे दोन दिवसीय तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. आंदोलनाचा भाग म्हणून शुक्रवारी (दि. 8) सकाळी 8 वाजता दुकाने उघडतील आणि सायंकाळी 6 वाजता बंद करतील.

या आंदोलनानंतर जर राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाने आपला निर्णय मागे घेतला नाही तर सोमवारपासून नियमित दुकाने उघडण्यात येणार असल्याचा इशाराही पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिला आहे

पुणे व्यापारी संघाच्या पदाधिकारी व सदस्य यांच्यात बैठकीत आयोजित करण्यात आली. त्यावेळी बैठकीत निर्णय घेतला आहे.

यात गुरुवारि विजय टॉकीज ते क्वार्टर गेटपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा व्यापारी सदस्य निषेधाचा फलक सोबत दंडावर काळी फित लावून निषेध नोंदविणार आहे. तसेच आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणजे शुक्रवारी (दि. 8) 8 वाजता उघडतील आणि सायंकाळी 6 वाजता बंद करतील. यावेळी पोलीस किंवा प्रशासकीय अधिकारी यांना जी कारवाई करायची आहे ती त्यांनी करावी अशा शब्दात रांका यांनी खुले आव्हान दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.