Pune Crime : अबुधाबी येथील पेट्रो केमीकल कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून 2.81 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – अबुधाबी येथील ॲडनाॅक पेट्रो केमीकल कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 2.81 लाखांची फसवणूक केली आहे. सिंहगड परिसरात ऑनलाईन पद्धतीने हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी सिंहगड रोड येथील 57 वर्षीय व्यक्तीने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी इन्डीड जॉब पोर्टलवर नोकरीसाठी नोंदणी केली होती. अज्ञात आरोपीने फिर्यादी यांचा इन्डीड जॉब पोर्टलवर फोन‌ नंबर मिळवून त्यांना संपर्क साधला. आरोपींना अबुधाबी येथील ॲडनाॅक पेट्रो केमीकल कंपनीतून बोलत असल्याचे फिर्यादी यांना सांगितले व टेलिफोनीक मुलाखत घेऊन त्याच कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखविले.

आरोपींनी  फिर्यादी यांच्याकडून व्हिासा, राहण्याची सोय व अन्य गोष्टीसाठी वेळोवेळी 2 लाख 81 हजार 543 एवढे पैसे घेऊन फसवणूक केली. पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.