Pune News : बीए मराठीच्या अभ्यासक्रमात महत्त्वपूर्ण बदल, मिळणार सोशल मीडियावर लिहण्याचे धडे

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बीएच्या अभ्यासक्रमात सोशल मीडियावर लिखाण कसे करावे, जाहिरात लेखन, संगणक ओळख, संहिता लेखन अशा विषयांचा समावेश केला आहे.

मानव विज्ञान विद्याशाखेत व्यहारीक शिक्षणाचा फारसा विचार केला जात नाही हे, लक्षात घेऊन मराठी विषयात व्यावहारिक शिक्षणाचा अंतर्भाव केला आहे. बीएच्या द्वितीय वर्षात ‘मराठी’चा अभ्यासक्रम बदलताना संगणक, सोशल मीडिया याचा विचार करण्यात आला आहे.

पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषदेने नुकतीच सर्व विद्याशाखांमधील द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात बदल केला, यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन या विद्याशाखांमधील अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना उद्योग, तंत्रज्ञान याच्या बदलत्या गरजांनुसार शिक्षण देण्याची तरतूद केली आहे. त्यासाठी स्वतंत्र क्रेडिट कोर्सची रचना केली आहे.

अभ्यासक्रमात या कौशल्यांचा समावेश केला आहे.

जाहिरात लेखन, मुलाखत लेखन, कार्यालयीन लेखन मध्ये ट्विटर, वॉट्स अ‍ॅप, चित्रफिती याचा अनौपचारिक वापर कसा करावा

संगणक व मोबाईलवर युनिकोडमधून मराठी मुद्रण, इनस्क्रिप्ट, फोनेटिक प्रकार, मराठी टंकलेखन व युनिकोडचा वापर गुगल इनपुट, मायक्रोसॉफ्ट इतर वापर.

गुगल फॉर्म, गुगल क्लासरूम, यूट्यूब याचा अध्ययनातील वापर, संगणक व मराठी यामध्ये मुक्सस्त्रोतांचा वापर, युनिकोड टंक ओळख, वर्ड एक्सल, पॉवर प्वाईंट.

प्रत्येक धड्यासाठी 15 तास शिकवले जाणार, एक श्रेयांक विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

काय आहे बदल ?

प्रकाशन व्यवहार आणि संपादन हा विषय आत्तापर्यंत कोणत्याही विद्यापीठात मराठी विषयात शिकवला जात नव्हता. संपादन, प्रसारमाध्यमे, नवमाध्यमे, व्यावसायिक पत्रव्यवहार आदी मध्ये सकस, नेमके, आशयपूर्ण लेखन करता येणे, उत्तम संज्ञापण कौशल्य प्राप्त होणे ही सध्याची गरज ओळखून अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

ब्लॉग, फेसबुक, ट्विटर या नवमाध्यमांचे प्रकार समजावून सांगणे, त्याचा वापर करताना साक्षरता, दक्षता आणि परिणाम सांगणे महत्त्वाचे आहे. वेबसाइट, ब्लॉगसाठी लिखाण करणे, व्यावसायिक पत्रव्यवहार समजावून सांगणे व प्रचारमाध्यामांसाठी लेखन हे शिकवले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.