Pune News : एकवट मानधनावरील कर्मचार्‍यांना सहा महिने मुदतवाढ

 एमपीसी न्यूज : कोविड संकटामध्ये कामासाठी महापालिकेने 45 दिवसांसाठी एकवट मानधन तत्वावर घेतलेल्या कर्मचार्‍यांची लसीकरण कालावधीतील गरज लक्षात घेऊन सर्वांना 6 महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतल्यामुळे दिलासा मिळाला आहे.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर ताण पडला होता. त्यातच महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील अनेक जागा रिक्त असल्याचे उपलब्ध मनुष्यबळात या संकटाला तोंड देणे जीकरीचे झाले होते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने 45 दिवसांसाठी एकवट मानधन तत्वावर वैद्यकीय अधिकारी, निवासी आरोग्य अधिकारी, आरोग्य निरीक्षक, हिवताप निरीक्षक, आया, औषध निर्माता, परिचारक, कक्ष सेवक यांची नेमणूक केली होती.

या सेवकांची मुदत संपल्याने आणि कोविड लसीकरणामध्ये मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन पालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी या कर्मचार्‍यांना सहा महिने मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवला होता. त्याला मंगळवारी समितीने मंजुरी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.