Pune News: मोठ्या माणसांवर टीका केल्याशिवाय काहींना प्रसिद्धी मिळत नाही; चंद्रकांत पाटील यांचा रोहित पवार यांना टोला

एमपीसी न्यूज – काही व्यक्तींना मोठ्या माणसांवर टीका केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही. अशांना माध्यमांनीच समजून सांगायला हवे की, टीका केल्याखेरीज देखील आम्ही तुम्हाला प्रसिद्धी देऊ. मग ते कदाचित टीका करणे बंद करतील, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता टोला लगावला.

भाजपच्या पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

रोहित पवार हे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर विविध मुद्द्याच्या माध्यमातून टीका करताना दिसतात. त्याचा संदर्भ घेत चंद्रकांत पाटील यांनी रोहित पवार यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडले.

अधिक बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले,  हे सरकार दिशाहीन आहे. एमपीएमसीच्या परीक्षा पुढे घ्यायच्या होत्या तर आधी निर्णय घ्यायला हवा होता, पण कोणीही निर्णयाची जबाबदारी घेत नाही.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तर मातोश्रीवर बसून आहेत.

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळवूनही सरकार महिना उलटून गेला आहे, समाजाला न्याय मिळण्यासाठी सरकार काय करणार आहे, असा सवालही त्यांनी विचारला

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.