Pune News: शारदा शिक्षण संस्थेच्या ‘जागर महिला सबलीकरणा’ला उत्स्फुर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – वसंत पंचमिचे औचित्य साधत शारदा शिक्षण संस्थेने महिलांसाठी आयोजित केलेल्या ‘जागर महिला सबलीकरणा’ला मोठा प्रतिसाद मिळाला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या महिला उपस्थित होत्या.

पुणे महापालिकेच्या महिला बालकल्याण समिती अध्यक्ष रुपाली धाडवे, नगरसेविका रंजना टिळेकर, मनीषा कदम , ऋषाली कामठे, माजी नगरसेविका विजया वाडकर, इलाईट शाळेच्या मुख्याध्यापिका जागृती अभंग, ॲक्टिव शाळेच्या मुख्याध्यापिका गौरी कुंभार यांच्याशी रिता इंडिया फाऊंडेशनच्या संस्थापिका रिता शेटीया यांनी संवाद साधला.

शारदा शिक्षण संस्थेतर्फे टीचर ट्रेनिंग कोर्स करणाऱ्या महिलांसाठी विविध योजना/सवलतींची घोषणा रुपाली धाडवे, शारदा शिक्षण संस्थेच्या संस्थापिका शीतल माळी आणि रंजना टिळेकर यांनी केल्या. यामध्ये फी सवलत 50% , नोकरीची हमी आणि नोकरी न लागल्यास 50% फी परत.

रुपाली धाडवे म्हणाल्या, ”शारदा शिक्षण संस्थेतर्फे महिलांसाठी घेण्यात येणारा हा उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे”. ”रोजगार निर्मितीद्वारे महिला सबलीकरण घडून आणण्याचे काम ही संस्था करत आहे. भविष्यातही करत राहील, असा विश्वास मनीषा कदम यांनी व्यक्त केला. संस्थेतर्फे हळदी कुंकू समारंभ ही करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गौरव डींगोरकर , गौरी वनारसे, शुभदा चवाथे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.